Tuesday, July 14, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीनिवडणूक एसआयआर प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी उल्लेखनीय काम केले - उद्योग मंत्री उदय...

निवडणूक एसआयआर प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी उल्लेखनीय काम केले – उद्योग मंत्री उदय सामंत

कुडाळ | प्रतिनिधी

टायगर ऑपरेशन हे सुरूच राहणार आता मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक माजी खासदार माजी आमदार हे रांगेत आहेत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगून आपला पक्ष वाढला पाहिजे आणि त्यामध्ये कोणाचीही अडकाती येणार नाही असे सांगून निवडणूक एसआयआर प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी उल्लेखनीय काम केले असल्याचे सांगितले.

कुडाळ येथे कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाची एसआयआर अंतर्गत बीएलए यांची बैठक झाली या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री व आमदार दीपकभाई केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, संपर्कप्रमुख बाळा चिंदरकर, मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपजिल्हाप्रमुख अरविंद करालकर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, आपल्या पक्षाच्या बीएलए यांनी चांगले काम केले आहे आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल आहे. पक्षाच्या दृष्टीने काम हे सगळ्यात महत्त्वाचे आहे बीएलए हा सर्वात मोठा पक्षाचा घटक आहे. त्यामुळे त्यांना ताकद आम्ही देऊ असे सांगून आमदार निलेश राणे यांची विधानसभेतील कामगिरी ही कौतुकास्पद आहे पहिल्या आमदारकीच्या काळामध्ये त्याने जे काम केले आहे ते सर्वांनाच प्रेरणा देणारे आहेत असे सांगून टायगर ऑपरेशन हे कधीही बंद होणार नाही अजून अनेक जण रांगेत आहेत पक्ष वाढवण्यासाठी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रंदिवस काम करत आहेत त्यामुळे आपणही त्याच प्रकारे काम केले पाहिजे पक्षाकडून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आमचे आहे. कुडाळ एमआयडीसी मध्ये लवकरच स्किल सेंटर उभारण्यात येईल. पर्यटनावर आधारित उद्योग उभे राहिले पाहिजेत म्हणून आम्ही काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्याचाही लाभ आपल्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले

आम्ही काही न करता विनायक राऊत यांची विकेट – आमदार निलेश राणे

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की नियतीचा फेरा असतो आणि त्या फेऱ्यातून कोणीच सुटत नाही राणे कुटुंबीयांवर विविध प्रकारे बोलणारे आणि त्याची चर्चा घडवून आणणारे माजी खासदार विनायक राऊत यांच्या घरातीलच व्यक्तींनी जे आरोप केले आहेत त्यामुळे नियती कोणाला सोडत नसते तुम्ही राणे कुटुंबीयांवर वारंवार आरोप करत गेलात बदनामी करत गेलात आता आम्ही काही न करता तुमच्यात कुटुंबातून तुमच्यावर आरोप होत आहेत असे सांगितले. पक्ष वाढीसाठी सर्वांनी मेहनत घेणे गरजेचे आहे बीएलए हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला सहकार्य करणे हे कार्यकर्त्यांचे काम आहे असे सांगून आम्ही सभागृहात जे काही विषय मांडतो ते पक्ष वाढीसाठी असतात, लोकांना न्याय देण्यासाठी असतात पक्ष संघटना सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने पक्षाचे काम केले. तरच पदे मिळतील असे या बैठकीत आमदार निलेश राणे यांनी सांगितले यावेळी बीएलए प्रमुख काका कुडाळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभापती मिलिंद नाईक यांनी केले.

छाया प्रथमेश जाधव

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!