कुडाळ | प्रतिनिधी
माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलावर आणि पत्नीवर झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील नानेली येथील हरिश्चंद्र घाडी याला ठाणा पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासासाठी ठाणा येथे घेऊन गेले आहेत.
माजी खासदार विनायक राऊत यांची सून हिने आपल्या नवऱ्यासह सासू सासरे चुलत सासरे तसेच भोंदू बाबा विरोधात तक्रार दिल्यानंतर ठाणा पोलिसांनी आपला मोर्चा भोंदू बाबांच्या दिशेने वळवला कुडाळ तालुक्यातील नानेली येथील हरिश्चंद्र घाडी यांच्या घरी येऊन हरिश्चंद्र घाडी यांना ताब्यात घेतले आणि तपासासाठी ठाणा येथे घेऊन गेले आहेत. आता या भोंदू बाबांकडून अजून काही नावे उघड होतात का? याकडे सिंधुदुर्ग वासियांचे लक्ष लागून आहे


