Tuesday, August 18, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षणाची अनोखी संधी*

कुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षणाची अनोखी संधी*

शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक अभिषेक गावडे यांचे विशेष सहकार्य…

 

कुडाळ | प्रतिनिधी 

शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून कुडाळ शहरातील मुलांसाठी एक दिवसीय मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मराठा समाज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध नृत्यांगना दीक्षा नाईक यांनी या एकदिवसीय कॅम्पमध्ये कुडाळ शहरातील तब्बल ६० मुलांना मोफत नृत्य प्रशिक्षण दिले. नृत्याची आवड असलेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन, नृत्याच्या विविध शैलींची ओळख तसेच नृत्यातील मूलभूत तंत्र आणि कौशल्ये याबाबत दीक्षा नाईक यांनी प्रशिक्षण दिले.

शहरातील अनेक मुलांना आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार नृत्य प्रशिक्षण घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे मुलांना कोणतेही शुल्क न आकारता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे. भविष्यातही कुडाळ शहरातील मुलांच्या कला, क्रीडा व शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.त्यावेळी व्यासपीठावर नगरसेवक विलास कुडाळकर, रवि कुडाळकर, सुरेश राऊळ आदी उपस्थित होते.

या मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिरामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण असून, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!