कुडाळ | प्रतिनिधी
हिलॉक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय हिलॉकचे सेक्रेटरी श्री. केशव उर्फ दीपक रमेश नारकर* यांनी सेक्रेटरी व संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर कामाचा ताण वाढल्याचे कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
आपल्या राजीनामा पत्रात नारकर यांनी म्हटले आहे की, मी गेले 12 वर्षे शिवाजी विद्यालय हिलॉकमध्ये सेक्रेटरी या पदावर काम करत आहे. मात्र अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे सातत्याने जिल्हा परिषदेच्या मीटिंग, विषय समित्यांच्या मीटिंग, आरोग्य विभागाच्या मीटिंग आणि मा. आमदार निलेश राणे यांचे राजकीय, सहकार व धार्मिक क्षेत्रातील कामकाज करताना हायस्कूलसाठी पुरेसा वेळ देता येत नाही.
त्यामुळे माझा राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे.
गत बारा वर्षात त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी मेहनत घेऊन काम केले मुख्यमंत्री शाळांमध्ये या शाळेला नेत्र दीपक यश मिळवून दिले
गेल्या 12 वर्षात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनपूर्वक आभारही मानले आहेत.


