Saturday, August 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळउपचारासाठी सुमारे ३ लाख २५ हजार एवढ्या किंमतीचे दागिने घेऊन जाणाऱ्या नानेली...

उपचारासाठी सुमारे ३ लाख २५ हजार एवढ्या किंमतीचे दागिने घेऊन जाणाऱ्या नानेली येथील दीपक विनायक सावंत यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कुडाळ | प्रतिनिधी 

उपचारासाठी सुमारे ३ लाख २५ हजार एवढ्या किंमतीचे दागिने घेऊन जाणाऱ्या नानेली येथील दीपक विनायक सावंत यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सोमवार २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

याबाबत हकीगत अशी की माणगाव भटवाडी येथील गोविंद सोनू नाईक यांच्या घरातील व्यक्तीकडून दीपक सावंत याने आपल्या घरातील व्यक्तीच्या उपचारासाठी ३ लाख २५ हजार एवढ्या रकमेचे दागिने घेतले होते जेव्हा या दागिन्यांची मागणी केली त्यावेळी त्यांनी दागिने देण्यास नकार दिला दरम्यान गोविंद नाईक यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दीपक सावंत विरोधात तक्रार दाखल केली तक्रारीच्या अनुषंगाने दीपक सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली न्यायालयात हजर केले असता सोमवार २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!