Thursday, August 27, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळग्रामपंचायत आंब्रड येथे मेगा ड्राईव्ह कॅम्पबाबत बैठक

ग्रामपंचायत आंब्रड येथे मेगा ड्राईव्ह कॅम्पबाबत बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जिमाका) :

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशांनुसार राबविण्यात येणाऱ्या १३ योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यांचा प्रचार-प्रसार तळागाळातील दुर्गम, ग्रामीण तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावाची निवड करण्यात आली आहे.

 या अनुषंगाने दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत आंब्रड येथे मेगा ड्राईव्ह कॅम्पच्या आयोजनाबाबत बैठक तसेच १३ योजनांबाबत कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले.

 बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. व्ही. नडगदल्ली, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय हिर्लेकर, सरपंच मानसी कदम, उपसरपंच विठ्ठल तेली, ग्रामपंचायत अधिकारी स्नेहा पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास राऊळ, सेजल परब, संगिता मेस्त्री, पद्मप्रभा तांबे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमित मुंज, विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संदीप परब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. व्ही. नडगदल्ली यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या १३ योजनांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावयाची आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या योजनांचा लाभ समाजातील गरजू व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मेगा ड्राईव्ह कॅम्पचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

 बैठकीचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी स्नेहा पाटील यांनी केले, तर उपसरपंच विठ्ठल तेली यांनी आभार मानले

000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!