Saturday, August 29, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ'रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी’ हा संदेश देत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने कुडाळ...

‘रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी’ हा संदेश देत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने कुडाळ शहरात ‘सुरक्षा राखी’ जनजागृतीपर उपक्रम

कुडाळ | प्रतिनिधी 

 

रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी’ हा संदेश देत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आजशुक्रवारी सकाळी कुडाळशहरात ‘सुरक्षा राखी’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

कुडाळ पोस्ट ऑफिस चौक येथे या उपक्रमाची सुरुवात झाली. पोलीस भगिनींनी वाहनचालकांना राखी बांधून सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगावर नियंत्रण, मद्यपान करून वाहन न चालविणे, मोबाईलचा वापर टाळणे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक विकास बडवे, प्रमोद काळसेकर, ममता जाधव, वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर, शाम भगत, सिद्धेश चिपकर, संदीप वराडकर, महेश जळवी आदी उपस्थित होते. वाहनचालकांसह पत्रकारांनाही सुरक्षा राखी बांधण्यात आली.

नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल, असे पोलीस निरीक्षक बडवे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!