कुडाळ | प्रतिनिधी
एखाद्या श्रद्धेच्या ठिकाणी शासनाचा निधी वापरता येत नसेल तर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करण्याची दानत लागते आणि हे काम जिल्हाप्रमुख दत्ता सामंत करतात असे आमदार निलेश राणे यांनी सरंबळ देऊळवाडी येथे बांधण्यात आलेल्या गणेश घाटाच्या लोकार्पण कार्यक्रमात सांगितले.
सरंबळ देऊळवाडी येथील श्रीदेवी सातेरी मंदिराच्या जवळ असलेल्या गणेश घाटाचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर आनंद शिरवलकर जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर तालुकाप्रमुख दीपक नारकर विनायक राणे जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते काका कुडाळकर सरंबळ सरपंच रावजी कदम तंटामुक्ती अध्यक्ष दीपेश कदम सुशील कदम आदी उपस्थित होते
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे मला मोठे करण्यामध्ये योगदान देत आहेत निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मला जे काही सहकार्य केले त्यामुळे हे यश मी पाहू शकलो या गणेश घाटामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्यासाठी शासनाचा निधी देण्याचे आम्ही केले होते पण त्या अडचणींमुळे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून हा गणेश घट बांधून दिला आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या श्रद्धेला त्यांनी भावनेची जोड दिली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.


