Thursday, September 10, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरातील बॅ. नाथ पै विद्यालयांमध्ये पोषण आहारामध्ये मुदत संपलेले मसाले...

कुडाळ शहरातील बॅ. नाथ पै विद्यालयांमध्ये पोषण आहारामध्ये मुदत संपलेले मसाले…

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ शहरातील बॅ. नाथ पै विद्यालयांमध्ये पोषण आहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्याची मुदत संपली असताना सुद्धा हा मसाला वापरला जात होता तसेच पोषण आहाराचे धान्य स्वच्छतागृहाच्या ठिकाणी ठेवले गेले होते यावरून कुडाळ शहर शिवसेना आक्रमक झाली आणि मुख्याध्यापक राठोड यांना धारेवर धरले अखेर गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी यासंदर्भातला अहवाल तयार केला आणि उचित कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

कुडाळ शहरातील बॅ. नाथ पै विद्यालयांमध्ये आहारामध्ये मुदत संपलेला मसाला वापरला जातो ही बाब पालकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर घटनास्थळी शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक राठोड यांना घेराव घालण्यात आला. यावेळी नगरसेवक विलास कुडाळकर, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, शिवसेना पदाधिकारी आबा धडाम, प्रथमेश केळबाईकर, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, राजवीर पाटील, संदेश सावंत, अलतमेश शेख उपस्थित होते. पहिल्यांदा ज्या ठिकाणी पोषण आहार बनवला जातो त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धडक दिली त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना विचारले असता हे सगळे साहित्य शाळेकडून दिले जाते आम्ही फक्त पोषण आहार बनवण्याचे काम करतो असे सांगितल्यानंतर मुख्याध्यापक राठोड यांच्याजवळ गेल्यावर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शिवसेना स्टाईलने जाब विचारल्यानंतर या शाळेमध्ये मुख्याध्यापकांकडून चाललेला भोंगळ कार्यभार निदर्शनास आला विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार हा किती घातक प्रकारे असतो हे उघड झाले. पोषण आहारामध्ये वापरला जाणारा मसाला हा मुदत संपलेला होता. तसेच स्वच्छतागृहाच्या बाजूच्या खोलीमध्ये पोषण आहारातील तांदूळ ठेवण्यात आले होते. सुमारे १ हजार २०० किलो एवढे तांदूळ सापडून आले याबाबत मुख्याध्यापक राठोड यांना विचारले असता हा तांदूळ मे महिन्याचा होता त्यानंतर आता आम्ही मागणी केली आहे मग विद्यार्थ्यांना जून ते सप्टेंबर पर्यंत कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरला जात होता. हे विचारले असता ते गप्प राहिले तसेच त्यांनी शासनाकडे दिलेले पोषण आहारा संदर्भातील मागणीचे अहवाल हे निरंक होते. मग हा तांदूळ कुठे जाणार होता. असा सवाल शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी उपस्थित करून तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करत आहात त्यांना उत्कृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत नाही उद्या या मुलांना काही झाले तर जबाबदार कोण राहणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला या घडलेल्या घटनेबाबत गटशिक्षणाधिकारी राऊत यांना सांगून घटनास्थळी बोलवण्यात आले त्यावेळी त्यांनी या घटनेबाबत माहिती घेऊन अहवाल तयार केला यावेळी शिक्षण संस्थेच्या कमलताई परुळेकर व श्री कुलकर्णी उपस्थित होते त्यांनी सुद्धा या घटनेबाबत खेद व्यक्त केला. यादरम्यान शिवसेनेकडून मुख्याध्यापक राठोड यांना निलंबित करावे तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!