कुडाळ | प्रतिनिधी
आमचे नेते शिवसेनाप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याएवढा नवनाथ बन मोठा झाला नाही असे आमदार निलेश राणे यांनी सांगून जर आमच्या नेत्यावर यापुढे बोललं गेलं तर आमची काहीही करण्याची तयारी आहे हे त्याने लक्षात ठेवावं प्रवक्ता आहे म्हणून काही बोलू नका असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला आहे.
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते याबाबत आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पराभवाची जबाबदारी प्रत्येकाने घेऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे काही ठिकाणी एकमेका विरुद्ध लढलो काही ठिकाणी एकत्र लढलो यामध्ये पराभव झाला असेल तर त्याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे मात्र नवनाथ पण हे आरोप करून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम करत आहे हे आम्ही खपवून घेणार नाही प्रवक्ता म्हणून आता तुमची कारकीर्द सुरू झाली आहे ती लवकर संपवू नका आम्ही सुद्धा तुमच्या प्रमाणे आरोप करू शकतो पण युक्ती धर्म पाळला पाहिजे या मताचे आम्ही आहोत या निवडणुकीमध्ये सातारा वाई फलटण या ठिकाणची माझ्या जवळ जबाबदारी होती त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला भाजपचा एकही माणूस येऊन भेटला नाही तरी आम्ही प्रामाणिकपणे काम केलं असे आमदार निलेश राणे यांनी सांगून मालवण निवडणुकीमध्ये काय घडलं याबाबतचे पुस्तक उघडायला लावू नका अशा अनेक निवडणुकांमध्ये काय काय घडलं याचे पुस्तक उघडलं तर ते महागात पडेल युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे काही दिवस पूर्णेकरांच्या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप होत असताना प्रवक्ता म्हणून एक तरी विषय मांडला का त्यांची बाजू घेणारे युतीकडून कोणीही बोलले नाही असे सांगून युतीमध्ये ते निर्माण झालं तर त्याचा फायदा विरोधकाला होणार आहे याची जाणीव ठेवली पाहिजे आणि शब्द जपून वापरले पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रवक्ता नवनाथ बन यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली


