सिंधुदुर्ग राजाची होणार उद्या ७ सप्टेंबर रोजी प्राणप्रतिष्ठापना

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना उद्या शनिवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते होणार आहे.

माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारणीला सिंधुदुर्ग राजा गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे ही प्रतिष्ठापना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते होणार असून श्रींची पूजा केली जाणार आहे तरी सर्व गणेश भक्त पदाधिकारी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.