‘पुतळे जरूर उभारा, पण आपले दुर्ग सुद्धा संभाळा’

0

गणेशाच्या आगमन मिरवणुकीमध्ये झळकले फलक 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली असून गणेश भक्तांनी गणेशाचे आगमन आपल्या घरी करण्यास सुरुवात केली आहे या गणरायाच्या आगमना बरोबरच काही भक्तांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशाच्या आगमन मिरवणुकीमध्ये ‘पुतळे जरूर उभारा, पण आपले दुर्ग सुद्धा संभाळा’ असे फलक झळकत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या उत्सवांमध्ये गणेश भक्त तल्लीन गणरायाची सेवा करतात गणरायाच्या आगमनाला काही तास उरले आहेत या आगमनापूर्वी गणेश भक्त आपल्या घरी गणेश चतुर्थी पूर्वी गणेशाचे आगमन करतात ज्याप्रमाणे विसर्जन मिरवणूक असते त्याचप्रमाणे गणेशाच्या आगमनाची मिरवणूक भक्तीमय वातावरणात काढली जाते आता या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये काही भक्तांनी सामाजिक संदेश देणारे फलकही झळकले आहेत काही दिवसांपूर्वी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आणि या भावना आता विविध माध्यमातून प्रकट होत आहेत याचाच एक भाग म्हणजे गणेश गणेशाच्या आगमन मिरवणुकीमध्ये ‘पुतळे जरूर उभारा, पण आपले दुर्ग सुद्धा संभाळा’ असे फलक गणेश फक्त मिरवणूकीमध्ये झळकवताना दिसत होते.