कमळे काढायला तलावात गेलेल्या युवकाचा झाला पाण्यात बुडून मृत्यू

0

कुडाळ | प्रतिनिधी

तालुक्यातील पाट गांधीनगर जळवीवाडी येथील संजय भरत जळवी (३८) हा पाट तलावात कमळे काढण्यास गेला असता बडून त्यांचा मृत्यू झाला ही घटना घडली

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार संजय जळवी हा नेहमी प्रमाणे पाट तलावात कमळे काढण्यास गेला होता त्याला फीट येण्याची सवय होती तलावात कमळे काढत असताना त्याला फिट आली पाण्यात पडून बडून त्याचा मृत्यू झाला याबाबत भाऊ आनंद जळवी यांनी निवती पोलीसात फिर्याद दिली मृतदेह बाहेर काढण्यात आला याबाबत निवती पोलीसात नोंद झाली