भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग राजाचे घेतले दर्शन
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राजाचे दर्शन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतले यावेळी गणरायासमोर येत्या विधानसभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघामध्ये भाजपचे उमेदवार निवडून यावेत असे गा-हाणे घातले गणरायाने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्र दिली तसाच आशीर्वाद त्यांनी यापुढे काळात ठेवावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गणरायाकडे केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, माजी नगरसेवक सुनील बांदेकर राकेश नेमळेकर, सौरभ सावंत, स्वरूप वाळके, तन्मय वालावलकर, विनायक घाडी आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी मागणी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सुखी, समृद्धी, आरोग्यदायी ठेवा, जनतेची प्रगती होऊन भरभराट होऊ दे. तसेच येत्या निवडणुकीमध्ये भाजपला तिन्ही मतदार संघात यश मिळू दे. असे साकडे घालून लोकसभा ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे यश दिले. त्याचप्रमाणे पुढील सगळ्या निवडणुका आणि भाजपच्या कार्यक्रमांमध्ये आशीर्वाद लागू दे. या मतदार संघातून माजी खासदार निलेश राणे उभे राहणार आहे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या अशी ही मागणी यांनी यावेळी केली.
