Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रशिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई | वृत्तसेवा

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात २१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. १७ सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर २१ ऑक्टोबरला आता सुनावणी होईल.

सुनावणी सातत्याने लांबणीवर

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले नसले तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. यापूर्वी सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही सुनावणी आज होणार असल्याचे समोर आले होते. पण आता सुनावणी लांबणीवर पडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!