महसूल विभागाने झाराप रेल्वे स्थानक येथे जप्त केलेल्या लाल मातीचे गुढ वाढले

0

कुडाळ | प्रतिनिधी

झाराप रेल्वे स्थानकावरून रेल्वेच्या मालवाहू गाडीतून वाहतूक करण्यात येणाऱ्या लाल माती संदर्भात गुढ वाढले असून ही लाल माती कुडाळ तहसीलदार यांनी जप्त केली आहे. सुमारे ७०० ब्रास एवढी लाल माती वाहतूक केली जाणार होती. मात्र तक्रारीनंतर ही माती महसूल विभागाने पंचनामा करून जप्त केली या मातीमध्ये कोणती खनिजे आहेत याची तपासणी करण्यासाठी लवकरच कोल्हापूर येथील खनिकर्म विभागाचे पथक येणार असल्याची खात्री खात्रीदायक वृत्त आहे.

झाराप रेल्वे स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाल माती वाहतुकीसाठी आणण्यात आली होती. दरम्यान याबाबत महसूल विभागाकडे लेखी तक्रार झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन या लाल मातीची पाहणी करून अधिकाऱ्यांनी या लाल मातीचा पंचनामा केला ही माती अनधिकृतपणे वाहतूक केली जात असल्याचे महसूल विभागाच्या लक्षात आले सुमारे ७०० ब्रास एवढी लाल माती वाहतूक केली जाणार होती या संदर्भात माहिती घेतली असता ही लाल माती दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश मध्ये घेऊन जाण्यात येणार होती तसेच प्राथमिक माहितीनुसार ही माहिती एका सिमेंट कंपनीमध्ये घेऊन जाणार होते मात्र त्या अगोदरच महसूल विभागाने ही माती जप्त केली दरम्यान कुडाळ तहसील विभागाकडून रेल्वे प्रशासन यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी कोणी परवानगी मागितली होती? या मातीचे मालक कोण? यासंदर्भात माहिती मागितली आहे तसेच जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून एवढ्या लांब अंतरावर साधी माती कोणी घेऊन जाणार नाही या मातीमध्ये नक्कीच कोणत्यातरी प्रकारचे खनिजे असू शकतात त्याची तपासणी होण्यासाठी परवानगी मागितली असून कोल्हापूर येथील खणीकर्म विभागाचे विशेष पथक या मातीची तपासणी करण्यासाठी लवकरच सिंधुदुर्गात येणार आहे. त्यानंतर माती वाहतूक करणाऱ्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे अशी खात्रीदायक वृत्त आहे.