रत्नागिरी | प्रतिनिधी
देवरुख येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ मुलींच्या संघाने उपविजेते पद प्राप्त केले. मुलींच्या संघात सानिका केळुसकर (वैयक्तिक पाचवा क्रमांक), निधी सावंत, वेदिका ललित, सेजल कासले यांनी उत्तम कामगिरी केली .या स्पर्धेत मुलींचे एकूण ८ संघ (४० स्पर्धक) होते.
सानिका केळुसकर हिची पुढे मुंबई मध्ये होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच मुलांचे एकूण १३ संघ (६५ स्पर्धक ) होते. मुलांच्या संघात गंधार पाताडे(वैयक्तिक सातवा क्रमांक), कमलेश मेस्त्री, अथर्व परब, प्रथम परब, सोहम ठाकूर यांनी उत्तम कामगिरी केली. गंधार पाताडे याची पुढे मुंबई मध्ये होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच या खेळाडूंना प्राध्यापक श्री.एस.एस.प्रभू, क्रीडा शिक्षक क्रिस्टन रॉड्रीक्स यांनी मार्गदर्शन केले. या खेळाडूंचे क्रीडा समन्वयक डॉ. एन. पी. कांबळे यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे सर आणि संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
