कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळत असून सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन १७ व्या दिवशी म्हणजे सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी केले जाणार आहे यानिमित्त सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात विविध धार्मिक, पारंपारिक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे.
कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी हा गणराय १७ दिवस असणार असून यानिमित्ताने बुधवार दि. १८ सप्टेंबर रोजी १२ व्या दिवशी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी १३ व्या दिवशी सत्यनारायण पूजा, २०-२० डबलबारी (पुरस्कृत सिद्धेश शिरसाट), बुवा- . दिनेश वागदेकर, तबला- श्री. अजित मार्गी, पखवाज- श्री. सचिन राणे, बुवा- श्री. समीर कदम, पखवाज- श्री. ओंकार दुखंडे, तबला- श्री. भावेश लाड, बुवा- श्री. संतोष दत्ताराम जोईल, पखवाज- अक्षय मेस्त्री, तबला- मंगिरीघ घाडी, शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी १४ व्या दिवशी संयुक्त दशावतार ‘राजा रुक्मांगद’ कलाकार महागणपती – श्री आनंद कोरगावकर, राजा रुक्मांगद श्री विलास तेंडोलकर, महाविष्णू- श्री. आनंद कोरगावकर, इंद्र- श्री संजय काळे, देवदूत कु. सागर गावकर, नारद श्री योगेश कोडुरकर, माळी – श्री संदेश वेंगुर्लेकर, विश्वसुंदरी कु यश जळवी, यम श्री उदय मोर्ये, कलीदेव श्री प्रशांत मयेकर, मडवळ – श्री कृष्णा घाटकर, मडवळीन श्री तुकाराम गावडे, राणी संध्यावली- श्री सुधीर तांडेल, संगीत वाद्यवृंद, हार्मोनियम- श्री पप्पू घाडीगावकर, मृदंगमणी श्री बाबा मेसी, तालरक्षक कु आकाश खानोलकर, विशेष सहाय्य – श्री मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ (मोरे), लाजरी क्रिकेट गृप (कुडाळ), शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी १५ व्या दिवशी डबलबारी (पुरस्कृत – संदेश उर्फ गोट्या सावंत), बुवा- श्री. संदीप पुजारी, श्री महादेश्वर प्रसादिक भजन मंडळ मु.पो. नाडन, ता. देवगड, गुरुवर्य – कै. जयराम घाडी, पखवाज- श्री. संकेत राऊत, तबला- श्री. मंदार राऊत बुवा- श्री. अभिषेक शिरसाट, श्री कोटेश्वर नवतरूण भजन मंडळ हरकुळ बु. (कणकवली), गुरुवर्य – भजनसम्राट प्रमोद हर्याण, पखवाज- श्री. रुपेश परब, तबला- श्री. अभिषेक सुतार, रविवार दि २२ सप्टेंबर रोजी १६ व्या दिवशी भजन, फुगड्या, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
