वर्षावरील गणपतीची घरकाम करणाऱ्या महिलांनी केली आरती

0

सर्वसामान्यांसाठी वर्षा निवासस्थान सदैव खुले

मुंबई | प्रतिनिधी 

घरकाम करणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांनी आज मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. वर्षावर या महिलांचे आदरातिथ्य करण्यात आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित महिलांसोबत आरती केली.

हे सरकार कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, महिलांचे सरकार आहे. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून रक्षाबंधनाच्या दिवशी लाभ मिळाला. दिवाळीतही भाऊबिजेला महिलांना लाभ मिळेल, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. महिलांना सक्षम करणे आणि त्यांची सुरक्षितता सरकारचे प्राधान्य आहे.

लाडकी बहिण योजनेची संजय राऊत यांना पोटदुखी – शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची टीका 

संजय राऊत यांना सकाळी उठून भोंगा वाजवण्याशिवाय काही काम नाही. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून सकाळी उठून ते वाटेल ते बडबड करतात, अशी टीका म्हात्रे यांनी केली. ज्यांनी कोरोनामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला. पत्राचाळीचा घोटाळा केला त्यांना १५०० रुपयांचे मोल नाही कळणार, अशी टीका त्यांनी केली. स्वत: खासदार म्हणून काही दिले नाही. महिलांना सरकार काही देत आहे तर राऊत यांच्या पोटात दुखत आहे, असा टीका म्हात्रे यांनी केली.

उबाठाची अवस्था ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला अशी झाली आहे. मुख्यमंत्री होण्याचा मोह नाही म्हणता मग भाजपसोबत युती का तोडली आणि नंतर स्वत:ला मुख्यमंत्री कसे जाहीर केले, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला. उबाठाला मुख्यमंत्री व्हायचे आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे सकाळच्या भोंग्याकडे लक्ष देऊन वाटेल ते बरळू नका, असा टोला शीतल म्हात्रे यांनी लगावला.