
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या प्रमाणावर गणेशाचे विसर्जन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पा मोरया….. पुढच्या वर्षी लवकर….. या जय घोषाने गणेशाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थी मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आज (मंगळवार) गणेश चतुर्थीच्या ११ व्या दिवशी आणि अनंत चतुर्दशी निमित्त मोठ्या संख्येने श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले नदी, ओहोळ, तलाव तसेच काही ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशाचे विसर्जन करण्यात आले. या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी तसेच गणपतीच्या जयघोषित विसर्जन करण्यात आले.
