फसवणूक प्रकरणी गुजरात येथील शाहिद मिलमालक विरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

कुडाळ | प्रतिनिधी

वाहनांच्या पार्टसाठी व वाहतुकीसाठी रक्कम देऊन सुद्धा वाहनांचे पार्ट न पाठवणाऱ्या गुजरात येथील शाहीद इस्माईल मिलमालक यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वेंगुर्ले येथील अजित कृष्णा नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे.

वेंगुर्ले येथील अजित नाईक यांचे के. के. पार्ट हे दुकान असून ते वाहनांचे पार्ट विकतात त्यांना सातत्याने विक्रीसाठी पार्ट लागत असल्यामुळे गुजरात बसू वडगामा येथील शाहिद इस्माईल मिलमालक याला मोबाईलद्वारे संपर्क साधून वाहनांचे पार्ट मागितले त्यासाठी कुडाळ येथील बडोदा बँकेतून बद्रापुरा समीरा साहू यांच्या नावे यांच्या बँक खात्यात २८ हजार ७९० एवढे रुपये जमा केले. त्यानंतर शाहिद यांनी वाहतुकीसाठी ४ हजार रुपयाची मागणी केली. ही रक्कम निनाज नुरा पटेल यांच्या गुगल पे वर पाठवली त्यानंतर अजित नाईक यांनी वेळोवेळी संपर्क साधून शाहिद मिलमालक यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीनुसार शाहिद याला पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र त्या पत्र व्यवहाराला सुद्धा प्रतिसाद न दिल्यामुळे कुडाळ पोलीस ठाण्यात शाहिद इस्माईल मिलमालक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.