मोबाईलमुळे आपली संस्कृती विसरलो आहोत का? तलाठी संतोष बांदेकर यांचा रिल्स होतोय व्हायरल

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

मोबाईलने माणसाचे पूर्ण जीवन व्यापून घेतले आहे आणि त्यामुळे माणसाला आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा विसर पडत चालला आहे या आधारावर कसालचे तलाठी व भजनी बुवा संतोष बांदेकर यांनी तयार केलेला रिल्स सध्या सर्वत्र व्हायरल होत असून खरोखरच मोबाईलमुळे आपली संस्कृती विसरलो आहोत का? हा प्रश्न सर्वांना निश्चित पडेल.

 सध्या गणेशोत्सवाची धूम होती आणि या गणेशोत्सवामध्ये भजन, फुगडी, आरत्या भक्तिमय वातावरणात सादर केल्या जात होत्या. पण सध्या मोबाईलमुळे आरत्या आणि भजने कशाप्रकारे केली जातात हे या रील्स मधून दाखविण्यात आले आहे भजनामध्ये सुद्धा भजनी बुवाच्या गायनापेक्षा मोबाईलकडे मंडळींचा लक्ष असतो अनेकांच्या आरत्या पाठांतर नाही हे या रिल्स मधून दाखविण्यात आले आहे आणि हा रील्स सध्या व्हायरल होत असून सर्वांना विचार करण्यासाठी भाग पाडणार आहे.