लाडकी बहीणींचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

0

दोडामार्ग | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवात महिलांच्या फुगडीने रंग भरला जातो आणि अशा फुगडी मध्ये महाराष्ट्र शासनाने आणलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर महिलांनी गीत रचून ती फुगडी गणेशासमोर दोडामार्ग तालुक्यातील एका गावात सादर सरकार बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या फुगडीची सध्या धूम माजली असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना आणली या योजनेची प्रसिद्धी प्रसार सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून केला आणि त्याला प्रतिसादही महिलांकडून मिळाला. दरम्यान गणेश उत्सवामध्ये सुद्धा या योजनेची धूम फुगडीच्या माध्यमातून महिलांनी माजवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एका गावामध्ये महिलांनी गणेशा समोर लाडकी बहीण या योजनेवर गीत रचून फुगडी सादर केली यामध्ये महिलांचे तीन भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे आभार मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वावर अभिमान व्यक्त केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असून ही फुगडी अनेक जण ऐकत आहेत.