मोरे येथील ओढ्यातून घरी परतताना घडली घटना
माणगाव येथे बाजारासाठी गेले होते धोंडी खरात
माणगाव | प्रतिनिधी
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मोरे वरची धनगरवाडी येथील सुमारे ६५ वर्षीय धोंडी बाबू खरात यांचा मृतदेह जवळच ओढ्याच्या पाण्यात सापडून आला घटनास्थळी पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहे.
माणगांव खोऱ्यातील मोरे वरची धनगरवाडी येथील धोंडी बाबू खरात हे बाजारासाठी सकाळी माणगाव येथे गेले होते ते बाजार करून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी येण्यासाठी परत होते ते मोरे येथील ओढ्याजवळ आल्यावर ते पाण्यातून पलीकडे जात असताना अचानक पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि या पुराच्या पाण्यात ते वाहून गेले गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी ढगफुटी झाल्याचे घटना घडली आहे या ओढ्याला सुद्धा या ढगफुटीमुळे ओढ्यातील पाणी वाढले. या पाण्यात वाहून गेलेले धोंडी खरात यांचा मृतदेह जवळच ओढ्याच्या पाण्यात सापडून आला घटनास्थळी तहसीलदार वीरसिंह वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, माणगाव दूरक्षेत्राचे भोई, भाजपचे कार्यकर्ते राजा धुरी तसेच इतर ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते रात्री उशिरा हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.