Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हाकणकवलीशाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री २ वा. घडला अपघात

शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री २ वा. घडला अपघात

सुदैवाने अनर्थ टळला ; गंभीर दुखापत नाही.

कणकवली | प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मध्ये असलेल्या डिवायडर संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा आज मध्यरात्री २ च्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ठराविक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले अपघाताची भीषणता एवढी होती की मध्यरात्री गाड झोपेत दोन वाजता मोठा आवाज झाला. एस टी बसचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

याच हायवेलगत बाजूला असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे घर असल्याने त्यांना तो आवाज येताच त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मग लगेचच पोलीस पाटील वृषाली मोरजकर, भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत कार्यात मदत केली तसेच मुलांनाही धीर दिला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनीही मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. अपघाताची खबर नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्यावरुन हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने, तसेच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव हे दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!