Tuesday, June 23, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला प्लॅन

कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला प्लॅन

वाहतूक कोंडी संदर्भात आमदार निलेश राणे यांनी दिल्या होत्या सूचना

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अनधिकृत बांधकामे तसेच जड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार कुडाळ नगरपंचायत येथे बैठक घेण्यात आली.

कुडाळ शहरांमध्ये वाढत असलेल्या वाहतूक कोंडी संदर्भात आमदार निलेश राणे यांनी प्रांताधिकारी-‍यांसह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे निर्देश दिले होते.

आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी प्रशासनाची बैठक कुडाळ नगरपंचायत येथे आयोजित केली होती. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी पोलादे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, बांधकाम विभागाचे अधिकारी बामणे, एसटी महामंडळाचे अधिकारी वारंग उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम हा कळीचा मुद्दा ठरला रस्त्याच्यालगत असलेली अनधिकृत बांधकामे त्यामुळे होत असलेले वाहतूक कोंडी यावर चर्चा झाली शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्ते याबाबतही चर्चा झाली या रस्त्यालगत असलेली अनधिकृत बांधकामे तोडल्याशिवाय वाहतूक कोंडी आटोक्यात येणे कठीण आहे. असे अधिकाऱ्यांनी सूचना केल्या. याबाबत सभेमध्ये ज्या विषयांवर चर्चा झाली याबाबत लवकरच आमदार निलेश राणे यांचा जवळ अहवाल सादर करून पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन घेतले जाणार आहे. अलीकडेच कुडाळ पोस्ट कार्यालय येथे डंपर अपघातामध्ये एका इसमाचा मृत्यू झाला होता वाहतूक कोंडीमध्ये होत असलेले अपघात याबाबतही चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडी दूर करायची असेल तर अनधिकृत बांधकामांबरोबरच जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याबाबतही चर्चा झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!