Sunday, May 10, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ*पिंगुळीत दीड लाख रुपये दागिने चोरण्याचा प्रयत्न फसला*

*पिंगुळीत दीड लाख रुपये दागिने चोरण्याचा प्रयत्न फसला*

*कुडाळ,4जुलै(वार्ताहर)*

पिंगुळी राऊळ वाडी येथील परूळेकरयांच्या घरी दिवसाढवळ्या दीड लाख रुपये चोरून नेण्याचा प्रयत्न फसला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. पिंगुळी राऊळ वाडीत संतोष परूळेकर यांचा बंगला आहे. गुरुवारी सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बंगल्याचा मुख्य दरवाजा कडी कोयडा हत्याराने उचकटून बंद बंगल्यात प्रवेश केला आणि घरातील कपाटे व बेड विस्कटून चोरीचा प्रयत्न केला परुळेकर दांपत्य ओरोस येथेजिल्हा न्यायालयात नोकरीला आहे सायंकाळी घरी आल्यावर दार उघडायला गेले तर कुलूप दिसले नाहीत्यामुळे त्याना संशय आला प्रवेश केला असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले कपाट उघडे होते बेडरूम मधील पलंगामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांना दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फोन करून खबर दिली पोलीस घटनास्थळी आले तेव्हा आजच्या बाजारभावानुसार 50 लाख रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे पोलिसाना सांगितले निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि श्वानपथक ठसे तज्ञ आणि गुन्हा अन्वेषण विभाग जिल्हा पोलीस अधीक्षक यांना घटनेची माहिती दिली अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सर्व साहित्य घरातच अस्ताव्यस्त विस्कटून टाकल पलंगातील कपडे चादरी बाहेर काढले ठिकाणी रोग रक्कम व सोन्याचे दागिने ठेवले होते ती त्या जागेवर सापडली नाही हा ऐवजचोरीस गेल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली त्यांनी मागील दरवाज्यातून प्रथम घरात घुसण्याचा प्रयत्न केला आत शिरताच त्यांनी जिन्याच्या माडीवर जाऊन दोन्ही कपाटाची कुलपे फोडली मधील पुस्तके साहित्य विस्कटले पण तेथील लॅपटॉप ला हात लावला नाही मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही पलंगातील दागिने कपडे विस्कटताना दुसरीकडे सरकले आणि दागिने सेफ राहिले रक्कम सेफराहिली आणि चोरीचा प्रयत्न फसला असे पोलिसांनी सांगितले दागिने व रोखरक्कम मिळून 24 लाख व 15 हजार रुपये रोख किमतीचा माल अज्ञात चोरट्याच्या हाती लागला नाही त्याचा चोरीचा प्रयत्न फसला आणि परूळेकर कुटुंबियाने निश्वास टाकला. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कोले पण निरीक्षक हाडके सुरेश राठोड श्री कदम प्रमोद काळसेकर कृष्णा केसरकर मंगेश शिंगाडे नंदकुमार चिंदरकर महेश जळवी यांनी तपास केला

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!