सस्नेह नमस्कार,
दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून *गणेशोत्सवानिमित्त विषेश प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२५* दि.१५,१६,१७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात येत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन मा.आ.श्री.नितेश राणेसाहेब, मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता संपन्न होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला उद्योजिका आणि व्यवसायिक महिलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही नर्मदाआई च्या माध्यमातून सातत्याने करत आहोत.येणार्या गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी आणि स्थानिकण उद्योजकांकडून उत्तम दर्जाची, विश्वास नीय ,तसेच रास्त दरात करुन स्थानिक व्यवसायिक व ग्राहक दोघांचाही फायदा व्हावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे. आम्ही आपल्या माध्यमांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांना आवर्जून या खरेदी महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.
धन्यवाद,
आपली स्नेहांकित,
सौ.संध्या प्रसाद तेरसे
अध्यक्ष
नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ
संपर्क:- 9423450353


