उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सरंबळ गावातील सुप्रसिद्ध वैद्य श्री.तळेकर यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.हा योग कुणाच्याही नशीबी नसतो. स्वतः परिश्रम घेऊन सेवा देणाऱ्या वैद्याचा सत्कार करणे ही सामान्य गोष्ट नसून हे आपले भाग्य आहे
असे गौरवोद्गार श्री.रुपेश पावसकर यांनी बोलताना काढले.गेली ६० वर्ष ते विनामूल्य स्वतः ची सायकल घेऊन सेवा देत जेव्हा डॉक्टर होते परंतु ते खेड्यापाड्यातील रस्त्यांअभावी लोकांपर्यंत पोहोचत नव्हते.तेव्हा ते जडीपोटी म्हणजेच जंगली झाडपाल्याचे औषध देऊन रुग्णांना बरे करत असत.त्याचप्रमाणे आजच्या स्वातंत्र्य दिनी सरंबळ गावात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला तसेच “शूर वीरांचे सरंबळ गाव” अशा आशयाच्या टोपीचे लोकार्पण श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी सोबत सरपंच श्री.रावजी कदम,उपसरपंच श्री.सागर परब, गाव तंटामुक्ती अध्यक्ष श्री.सुनील हादगे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


