Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ*रणझुंजार मित्र मंडळ आयोजित रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव श्री देव कलेश्वर...

*रणझुंजार मित्र मंडळ आयोजित रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव श्री देव कलेश्वर 2025 तसेच सुदृढ बैल प्रदर्शन स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…….*

रणझुंजार मित्र मंडळ व रुपेश पावसकर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा 2025 या स्पर्धेदरम्यान सुदृढ बैल प्रदर्शन व गावातील समाजसेवा करणारे समाजसेवक तसेच विशेष कलागुण असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ श्री दाजी राऊळ यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.या कार्यक्रमास अनेक सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.या दहीहंडी स्पर्धेत यशस्वी सलामी देणाऱ्या संघास रोख रक्कम रुपये 2000/- तर दहिहंडी फोडणाऱ्या स्पर्धकास रोख रक्कम 15000/- देण्यात आले.या स्पर्धेत प्रथम सहभाग शिवयोद्धा गोविंदा पथक परुळे यांनी सहभाग घेतला त्यानंतर युवा तरुण मित्रमंडळ माठेवाडा कुडाळ यांनी द्वितीय सहभाग घेतला.तर तृतीय सहभाग काळंबा गोविंदा पथक डिगस यांनी घेतला या स्पर्धेतील खास आकर्षण म्हणजेच बैल प्रदर्शन आजकाल लोक बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात पण नेरूर पंचक्रोशीत आजही सुदृढ बैल जपले जातात.या बैल प्रदर्शनात सहभागी होणारे बैल मालक यामध्ये श्री.प्रकाश साऊळ,श्री. आजीम मुजावर,श्री.भाई नारिंग्रेकर,श्री.विशाल नाईक,श्री. बाळा रेवंडकर,श्री.आनंद लिंगे,श्री. अवि शिरसाट,श्री.स्वप्नील नेरुरकर,श्री.बाळा नांदोस्कर,श्री.बाबी साऊळ,या बैल मालकांनी सुदृढ बैल प्रदर्शनात सहभाग घेतला,या स्पर्धेदरम्यान देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री.चारुदत्त देसाई यांनी उद्योजक श्री.रुपेश यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले आजपर्यंत आमच्या गावात कोणीही अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही परंतु तुम्ही हा कार्यक्रम घेतला हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार श्री चारुदत्त देसाई यांनी काढलेया स्पर्धेस खास शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. रणजित देसाई यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात समाजात सामाजिक कार्य करणारे समाजसेवक तसेच विविध उपक्रमांमध्ये नाविन्य प्राप्त केलेले विद्यार्थी यामध्ये श्री.प्रकाश परब हे विनामूल्य ड्रेसिंग सेवा देतात.कु.अक्षय चव्हाण यांनी कबड्डी खेळात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.श्री.शैलेश नाईक हे राज्यस्तरीय पंच म्हणून काम पाहतात.श्री.राजा शृंगारे हे रानभाजी महोत्सवाचे विशेष नियोजन करतात श्री.विनायक नाईक,श्री.अमोल शृंगारे हे गावातील कोणत्याही व्यक्तीस रक्ताची गरज असल्यास जलद रक्त उपलब्ध करून देतात.श्री. विलास मेस्त्री हे मंदिराचे कळस सुशोभित करतात श्री.आप्पा कुंभार हे कृषी विषयक अभ्यासक आहेत तसेच ते मार्गदर्शन करतात संकेत घाडी हे कबड्डीपटू म्हणून विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू आहेत श्री. पप्पू मलगुंडे हे उत्कृष्ट डॉक्टर आहेत गावातील कोणताही व्यक्ती रात्री अपरात्री आजारी पडल्यास ते त्वरित जाऊन इलाज करतात. श्री.सिद्धेश कलिंगण,श्री.पंकज कलिंगण हे वडिलांचा वारसा पुढे नेत दशावतारी नाटक उत्तम करतात. श्री मिलिंद मिस्त्री हे ट्रीकसीन नाटकाचे नियोजन उत्तम करतात. नेरूर कलमे वाडीतील श्री.राजन पावसकर यांची कन्या कु.तन्वी पावसकर या डान्स कलेत विशेष प्राविण्य प्राप्त करतात. निलेश गुरव हे उत्तम निवेदक आहेत. त्यांनी कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. श्री वैभव ठाकूर हे गावातील उत्कृष्ट वायरमन आहेत. त्यांनी नुकतेच अपघातातून सावरत सेवा सुरू केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला श्री संतोष गावडे यांची कन्या ही उत्कृष्ट महिला कबड्डीपटू असून तिचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच श्री मंजुनाथ फडके हे गावातील उत्कृष्ट उद्योजक व गावातील भटजी (ब्राह्मण)म्हणून सेवा देतात त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.श्री.संतोष कुडाळकर हे समाजसेवा करतात श्री.पियुष लाड यांनी ए.पी.एस, एस टी.एस.,जी.टी.एस,बी. टी.एस या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केले आहे त्याचप्रमाणे रिक्षा युनियन अध्यक्ष,ओम शिवकृपा मंडळ कु.रुची नेरुरकर या विविध ठिकाणी अभिनय करतात.अशा एकूण 25 समाजसेवक तसेच विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेदरम्यान युवा मित्र मंडळ कुडाळ माठेवाडा यांनी या स्पर्धेदरम्यान एक देशप्रेमी संदेश दिला ” ना देशासाठी लढले ना मातीसाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले” असा संदेश युवा मित्रमंडळ माठेवाडा यांनी दिला.या स्पर्धेत शिवयोद्धा गोविंदा पथक परुळे यांनी दहीहंडी फोडत रोख रक्कम रुपये 15000/- प्राप्त केले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री.संजय नेरुरकर,श्री.प्रभात वालावलकर,श्री.नरेश नेरुरकर,श्री. गोपाळ बुधाजी नेरुरकर यांनी केले.या स्पर्धेत विशेष मेहनत श्री.कल्पेश मार्गी,श्री.सुधीर नेरुरकर,श्री.कृष्णा पाटकर,श्री.प्रवीण नेरुरकर,श्री.अमोल श्रृंगारे,श्री.पंडित घाडी,श्री.सतीश सावंत,श्री.किशोर सावंत,श्री.उमेश परब,श्री.दर्शन साऊळ,श्री.संतोष परब,आदी कार्यकर्त्यांनी विशेष सहभाग घेतला.या स्पर्धेचे श्री.समीर नलावडे यांच्या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून खास प्रक्षेपण करण्यात आले.या स्पर्धेसाठी श्री.चिन्मय शिर्के यांच्या साउंड सिस्टम मुळे रंगत आली.या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर यामध्ये सरंबळ सरपंच श्री.रावजी कदम,नेरूर माजी सरपंच श्री.शेखर गावडे,श्री.आनंद नेरुरकर,श्री.अशोक पावसकर,श्री.बाळा पावसकर,श्री.संजय नेरुरकर,श्री.बाळा घाडी,श्री.दत्तात्रय देसाई,श्री.दाजी गावडे,श्री.प्रकाश साऊळ,श्री. बाळा धुरी,आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!