कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळत आहे. दर दिवशी विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात सुरू आहे.
सिंधुदुर्ग राजाचे यावर्षी १६ वे वर्ष असून २१ दिवसांचा गणराया असणार आहे गणरायाच्या दरबारात दररोज धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम साजरे होत आहे घरोघरी विराजमान झालेल्या गणरायांचे विसर्जन झाल्यानंतर सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळत आहे. सिंधुदुर्ग राज्याच्या लग्नामध्ये भजने, दशावतार नाटक अशी विविध कार्यक्रम साजरे होत आहे.


