Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग..! आग लागली की लावली याबाबत चौकशीची मागणी..!!

कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग..! आग लागली की लावली याबाबत चौकशीची मागणी..!!

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आज (बुधवारी) सायंकाळी आग लागली ही आग एवढी भयानक होती की कचरा डेपो मधील आगीमुळे धूर मोठ्या प्रमाणावर पसरला होता. ही आग लागली की लावली गेली याबाबत नगरपंचायत प्रशासनाने चौकशीची मागणी केली आहे.

कुडाळ येथील सांर्गिडेवाडी येथे नगरपंचायतीचा कचरा डेपो गेले अनेक वर्ष आहे मात्र यापूर्वी अशा प्रकारची आग कधी लागली नव्हती आज बुधवारी या डेपोला सायंकाळच्या वेळेला अचानक आग भडकली त्यावेळी डेपो जवळ असलेले कर्मचारी नव्हते ही आग आग लागल्याचे समजल्यावर घटनास्थळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक निलेश परब, सौ संध्या तेरसे, श्रेया गवंडे त्यानंतर विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर हे दाखल झाले तसेच प्रशासन अग्निशामक दल कर्मचारी यांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग मोठ्या प्रमाणावर भडकल्यामुळे धुर ही झाला होता हा धूर पूर्णपणे परिसरात पसरला होता. ही आग आटोक्यात आले मात्र धूर पसरला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!