Saturday, June 20, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहर विकास आराखड्यावरून संभ्रम; डीपी प्लॅनबाबत माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी

कुडाळ शहर विकास आराखड्यावरून संभ्रम; डीपी प्लॅनबाबत माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी

आरक्षणाच्या कैचीत सामान्य

डीपी प्लॅन माहिती सांगण्यात सत्तारूढ गप्प का

 

 कुडाळ,20

 कुडाळ शहर विकास आराखडा अर्थात डीपी प्लॅन जाहीर झाल्यापासून शहरवासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके कुठे आरक्षण पडले, किती जमीन जाणार, रस्ते किती मीटरचे होणार याबाबत नागरिक अंधारात असल्याने अस्वस्थता पसरली आहे.डीपी प्लॅनबाबत नगरपंचायतीचे सत्तारूढ नगराध्यक्ष व नगरसेवक कोणतीच माहिती देत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू असून हे प्रकरण सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरण्याची चिन्हे आहेत.

प्रमुख मंडळींनी आपापल्या जागेवरील आरक्षणे उठवली. त्या ठिकाणी काहीच ठेवले नाही. मात्र लोकवस्तीच्या ठिकाणी ग्रीन झोन लावण्यात आले. व्यवसाय असलेल्या ठिकाणचे रस्ते मोठे करून त्या जागा घेण्यात आल्या, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

नेमका डीपी प्लॅन कसा आहे, कुठे आरक्षण आहे, कुठे ग्रीन झोन आहे, कुठले रस्ते किती मीटरचे घेतले आहेत याबाबत माहिती द्यावी अशी मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन किंवा सत्तारूढ पदाधिकारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. माहिती मिळत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

डीपी प्लॅनबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने हा प्लॅन रद्दच करावा, अशी मागणीही शहर परिसरातून जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!