कुडाळ | प्रतिनिधी
व्यवसायाचा परवाना नसताना आपला बाजार मॉल सुरू झाला त्याबद्दल आलेल्या तक्रारीवरून तपासणी केली असता त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे अजून आले त्यामुळे जोपर्यंत ते परवानगी घेत नाहीत तोपर्यंत हा मॉल बंद राहील असे निर्देश त्यांना दिले असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथे आपला बाजार हा मॉल सुरू झाला होता अवघ्या दोन दिवसांमध्ये हा मॉल बंद करण्यात आला याबाबत कुडाळ शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपला बाजार याच्यावर छापा टाकला यामध्ये अन्नसुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे व गावीत यांनी तपासणी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी आढळून आली नाही तसेच या ठिकाणी काही खाद्यपदार्थांचे नमुने सुद्धा त्यांनी घेतले दरम्यान अन्नसुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की तक्रार आल्यानंतर तपासणी केली या तपासणीमध्ये त्यांच्याजवळ कोणतीही कागदपत्रे नसल्याचे अजून आले त्यामुळे हा मॉल जोपर्यंत आवश्यक परवानगी मालक घेत नाहीत तोपर्यंत बंद राहणार आहे हा मॉल विनापरवाना सुरू होता त्यांनी परवानगी घेतल्यानंतर मॉल सुरू करण्यात येईल या ठिकाणी गुळाचे नमुने घेतले आहेत ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.


