Saturday, June 20, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ येथील आपला बाजार वर अन्न औषध प्रशासन विभागाने केली कारवाई परिसरात...

कुडाळ येथील आपला बाजार वर अन्न औषध प्रशासन विभागाने केली कारवाई परिसरात खळबळ*

कुडाळ २०

कुडाळ शहरात सिने अभिनेत्रीला आणून थाटात सुरू झालेल्या आपला बझार मॉलवर अन्न भेसळ प्रशासन विभागाने शुक्रवारी सायंकाळी व्यवसाय बंदची कारवाई केली .जो पर्यत लायसन्स परवानगी घेतली जात नाही तोपर्यत आपला बझार बंद राहणार.विना परवाना असल्यामुळे आम्ही तपासणी केली. संशय आल्याने गुळाचे  नमुनेसुद्धा घेण्यात आले आहेत ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी दिला 

     मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या दोन दिवसांपूर्वी (१७ जून) मोठ्या गाजावाजात उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बझार’ या स्टोअरचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुरता बुरखा फाडला आहे. “उद्घाटनाला मोठा गाजावाजा केला, मात्र महत्त्वाच्या परवानग्या वजा” केल्याचे अधिकृतपणे सिद्ध झाले आहे. हे भव्य स्टोअर चक्क FDA चे कोणतेही वैध FSSAI अन्न परवाना (Food License) नसताना बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाला असून, प्रशासनाने तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

   या धडक कारवाईची अधिकृत माहिती देताना पत्रकार परिषदेत देताना कुडाळ-वेंगुर्ला विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी सांगितले की, माहिती मिळताच ते स्वतः आणि त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी गावित अशा दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने ‘आपला बझार’ स्टोअरमध्ये प्रत्यक्ष तपासणी केली.

या तपासणीदरम्यान स्टोअरचे मालक नाईक उपस्थित नव्हते आणि त्यांनी आपली पूर्ण माहितीही डिस्प्ले केली नव्हती. त्यामुळे घटनास्थळी हजर असलेले स्टोअर मॅनेजर अमोल सुतार यांच्या उपस्थितीतच सर्व कायदेशीर कारवाई पार पाडण्यात आली आणि त्यांच्याच नावे नोटीस बजावण्यात आली.

नियमानुसार ज्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर (उलाढाल) दीड कोटी रुपयांच्या वर असतो, त्यांना FDA कडून FSSAI चा ‘व्हॅलिड परवाना’ घेणे अत्यंत बंधनकारक आहे. या स्टोअरच्या सांगण्यानुसार त्यांचा वार्षिक व्यवसाय दीड कोटीच्या वर जाणार होता, असे असूनही त्यांनी परवाना घेतला नव्हता. विनापरवाना अन्न व्यवसाय सुरू ठेवणे हा अन्न सुरक्षा कायदा कलम ३१ नुसार गंभीर गुन्हा असून, कलम ६३ नुसार तो शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे FDAच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ‘व्यवसाय बंद’ करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत वैध FSSAI लायसन्स मिळत नाही, तोपर्यंत स्टोअर उघडता येणार नाही.

केवळ परवान्याच नव्हे, तर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत FDA अधिकाऱ्यांनी स्टोअरमधील गुळाच्या साठ्यातून संशयावरून नमुने जप्त केले आहेत. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच येणार आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,

“या स्टोअरला आता ऑनलाईन अर्ज करून FDA च्या वरिष्ठ कार्यालयाकडून साहेब अप्रूव्हल घ्यावे लागेल. जर त्यांच्या अर्जात किंवा स्टोअरमध्ये काही त्रुटी असतील, तर त्या त्यांना पूर्ण कराव्या लागतील. संपूर्ण तपासणी होऊन जोपर्यंत वैध FSSAI लायसन्स ग्रॅंड (मंजूर) केले जात नाही, तोपर्यंत त्यांना व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. तसेच भविष्यात ग्राहकांकडून कोणत्याही दुकानाबाबत तक्रार किंवा संशय आल्यास, तिथेही अशीच कडक कारवाई केली जाईल.”सेलिब्रिटी आणून उद्घाटन करणाऱ्या मॉल चालकांना FDA ने दिलेल्या या कायदेशीर दणक्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी वर्गात चर्चा रंगली आहे.

कुडाळ 

येथील नव्यानेच सुरू झालेल्या आपला बझार वर अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी अभय चंदनशिवे व गावित यांनी कारवाई केली

पत्रकार परिषदेत बोलताना अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!