Sunday, June 28, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीअंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न...

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न…

पणदुर

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी माननीय श्री. शेखर लव्हे साहेब, प्रभारी अधिकारी-ओरोस पोलीस स्टेशन प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व, कायदेशीर बाबी तसेच निरोगी व जबाबदार जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मान. श्री. आपासाहेब गावडे, मुख्याध्यापक श्री. एम. जी. कर्पे सर, संचालक व साहा. शिक्षक श्री. एम. एस. पाटील सर, श्री. आर. जी. कर्पे सर, श्री. ए. एस. वालावलकर सर तसेच श्री. एस. आर. झेंडे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील अद्ययावत स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा व इतर शैक्षणिक सुविधांची माननीय श्री. शेखर लव्हे साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली व शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये “व्यसनमुक्त जीवन – सुदृढ भविष्य” हा संदेश प्रभावीपणे पोहोचला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!