Sunday, October 11, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीनिवजे ग्रामपंचायतीचे उबाठाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार...

निवजे ग्रामपंचायतीचे उबाठाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश

कुडाळ | प्रतिनिधी 

आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा विकास करतो म्हणजे उपकार करत नाही ते आमचे कर्तव्य आहे असे आमदार निलेश राणे यांनी निवजे येथे उबाठा सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केलेल्या शिवसेनेमध्ये केलेल्या प्रवेशावेळी सांगितले.

निवजे ग्रामपंचायतीचे उबाठाचे सरपंच महेंद्र पिंगुळकर उपसरपंच पूजा पालव तसेच ग्रामपंचायत सदस्य व उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा प्रवेश निवजे येथे झाला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, महिला जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, सभापती मिलिंद नाईक, तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, रुपेश कानडे, पंचायत समिती सदस्य दिव्यांनी खरात, सौ. सावंत, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, देवेंद्र नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, घावनाळे सरपंच दिनेश वारंग, निवजे शाखाप्रमुख सखाराम चव्हाण, राजू शेडगे, विलास पालव, अनिकेत तेंडोलकर, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, दिनेश शिंदे, पिंट्या राऊत, विजय जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की तुम्ही या पक्षांमध्ये प्रवेश केला म्हणजे आमच्या कुटुंबात प्रवेश केला तुमची कोणतीही कामे अडणार नाहीत. तुम्ही ज्या विश्वासाने पक्षांमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगून या जिल्ह्याचे उपकार आम्हा राणे कुटुंबियांवर आहेत. त्यामुळे तुमच्या विकासाला निधी कमी पडून देणार नाही ते आम्ही उपकार करत नाही अधिवेशनामध्ये ज्या काही विकास कामांना मंजुरी मिळते त्याला युती सरकारचे श्रेय आहे असे सांगून माझी जी ओळख निर्माण झाली आहे ती जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यामुळे सोशल मीडिया पेक्षा त्यांचे काम मोठे आहेत असे सांगितले. 

 

कुडाळ एमआयडीसी मध्ये २४ तास विज व पाणीपुरवठा राहणार 

आमदार निलेश राणे यांनी सांगितले की उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत माझे बोलणे झाले आहे पुढे एमआयडीसीमध्ये २४ तास वीज व पाणी पुरवठा सुरू राहिला पाहिजे यासाठी ९० कोटी रुपये आवश्यक आहेत आणि हा निधी देण्याचे त्यांनी कबूल केले आहे तसेच रत्नागिरी मध्ये कोको कोला कंपनीचे ज्याप्रमाणे युनिट आले आहे त्याप्रमाणे कुडाळमध्ये सुद्धा व्हावे अशी मागणी केली आहे रोजगार निर्माण व्हावेत याकडे आमचे पूर्णपणे लक्ष आहे आतापर्यंत दीड हजार कोटी कुडाळ मालवण मतदार संघासाठी आणलेले आहेत जे दहा वर्षात आले नव्हते तो बॅक लॉक आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!