सिंधुदुर्ग, 3 जुलै
समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 9 मार्च 2026 पासून 2 जुलै 2026 पर्यंत एकूण 116 दिवस आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन चालू होते त्यास मोठे यश मिळाले आहे.
समग्र शिक्षा मधील उर्वरित करार कर्मचारी यांचा 20 वर्षाचा वणवास संपून समग्र शिक्षा मधील उर्वरित करार कर्मचाऱ्यांना *आधिसंख्य* हे पद निर्माण करून महाराष्ट्र राज्य शासन मंत्रीमंडळाने मंजुरी देऊन शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत 2 जुलै 2026 रोजी घेण्यात आला आहे.
त्यामुळे समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब , उपमुख्यमंत्री मा. ना .एकनाथजी शिंदे साहेब, मा. ना. सुनेत्रा ताई पवार , शिक्षण मंत्री मा. ना. दादासाहेब भुसे, शिक्षण राज्यमंत्री मा. ना. पंकज भाऊ भोयर, माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन मा. ना. भरत शेठ गोगावले,कॅबिनेट मधील सर्व मंत्री महोदय,शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्राध्यापक मनोहर धोंडे सर, व समग्र शिक्षा अभ्यास समिती सदस्य मा. आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब,आमदार मा. मनिषा कायंदे मॅडम,आमदार मा. ज. मो. अभ्यंकर साहेब, आमदार मा. किशोर जी दराडे साहेब,मा. आमदार निरंजनजी डावखरे साहेब व राज्यातील सर्व सन्माननीय आमदार महोदय यांच्यासह राज पत्रित अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना,सर्व शिक्षक संघटना व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे
समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने जाहीर आभार मानण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समग्र शिक्षा अंतर्गत४८ पदे कायम झाली आहेत


