Saturday, July 4, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरात सुरू असलेल्या नमो उद्यानची माहिती कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल...

कुडाळ शहरात सुरू असलेल्या नमो उद्यानची माहिती कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी घेतली

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरात सुरू असलेल्या नमो उद्यानची माहिती कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी घेतली आणि हे उद्यान पाहण्यासाठी लवकरच येईल असे सांगितले त्यांचे स्वागत नगरसेवक निलेश परब यांनी केले. 

विभागीय कोकण आयुक्त रुबल अग्रवाल या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. दरम्यान कुडाळ शहरांमध्ये सुरू असलेल्या नमो उद्यानाच्या कामाबाबत त्यांनी अभियंता सोनाली हळदणकर यांच्या जवळून माहिती घेतली. तसेच त्यांनी नमो उद्यानची डिझाईन पाहिली नमो उद्यान पाहण्यासाठी मी लवकरच पुन्हा कुडाळमध्ये येईल असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांचे स्वागत नगरसेवक निलेश परब यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार सचिन पाटील, नगरपंचायतीचे लेखापाल स्वप्नील पाटील, संकेत गावडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!