कुडाळ | प्रतिनिधी
गुरे घेऊन शेतात गेलेले आकेरी पालववाडी येथील ६१ वर्षीय गणेश पुंडलिक पालव हे ओहोळा मध्ये वाहून गेले त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
६१ वर्षीय गणेश पालव हे घरा नजीक असलेल्या शेतीमध्ये आपली गुरे घेऊन गेले होते जात असताना मध्ये ओहोळ लागतो या ओळातून शेतीमध्ये जात असताना ओहोळातील पाण्यामध्ये ते वाहून गेले आणि त्यांचे निधन झाले याबाबत यांचा मुलगा समीर पालव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे


