Sunday, July 5, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीअयोध्या श्रीराम मंदिर येथे झालेल्या हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराच्य विरोधात कुडाळ मारुती मंदिर...

अयोध्या श्रीराम मंदिर येथे झालेल्या हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराच्य विरोधात कुडाळ मारुती मंदिर येथे महाआरतीकरुन केला निषेध              

माजी आमदार वैभव नाईक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभय शिरसाट ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक शहर प्रमुख संतोष शिरसाट..आदी सहभागी

कुडाळ, 5जुलै

  अयोध्या येथील सकल हिंदूचे आराध्य दैवत श्रीराम मंदिर येथे झालेल्या जमीन व रामभक्तानी दिलेल्या देणगीत हजारो कोटीचा घोटाळा झाला या निषेधार्थ कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ शहर येथील श्री. देव मारुती मंदिर येथे रविवार संध्याकाळी महाआरती करण्यात आली .

आणि गांधीगिरीने निषेध केला 

अयोध्या राम मंदिर देणग्यांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत, आज कुडाळमध्ये महाविकास आघाडी कमालीची आक्रमक झालेली पाहायला मिळाली!

कुडाळ शहरातील श्री देव मारुती मंदिर येथे आज तालुका महाविकास आघाडीच्या वतीने रविवार सायंकाळी ५ वाजता एका भव्य ‘महाआरती’चे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिराच्या नावावर झालेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक येथे मोठ्या संख्येने गोळा झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!