Sunday, July 5, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळमध्ये वादळी वाऱ्याचा तडाका ...!

कुडाळमध्ये वादळी वाऱ्याचा तडाका …!

शहरात घरावर झाड पडले, घराचे पत्रे उडाले 

 

 

कुडाळ प्रतिनिधी 

तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे कुडाळ शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच चेंदवण या ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे.

गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे या कोसळणाऱ्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज (रविवारी) वादळी वाऱ्यामुळे सकाळी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथील नील फणसाचे झाड कोसळून यामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीचे नुकसान झाले. तसेच शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील आत्माराम कमलाकर कुडाळकर यांच्या घरावर झाड पडून छपराचे नुकसान झाले तसेच सुशीला सुरेश कुडाळकर यांच्या घराचे पत्रे उडून गेले आणि नुकसान झाले चेंदवण येथील गिरीजाबाई महादेव मेस्त्री व प्रमोद मेस्त्री यांच्या घरावर औदुंबराचे झाड व भेडला माड पडून छप्पराचे व इतर वस्तूंचे नुकसान झाले याबाबत कुडाळ तहसील कार्यालय येथे कळविण्यात आले असून या घटनेचे पंच यादी घातली जाणार आहे. तसेच काही ग्रामीण भागामध्ये रस्त्यालगत असलेली झाडे पडून काही का रस्ते बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!