Monday, July 6, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीमध्यरात्री १२ वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर ऑन फिल्ड.!

मध्यरात्री १२ वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर ऑन फिल्ड.!

मारुती मंदिर परिसरातील वडाचे झाड हटविण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न.!

 

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली शहरातील आशिये मारुती मंदिर परिसरात मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान मोठे वडाचे झाड कोसळले. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या उपस्थितीत झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. हे काम सलग सुरू राहिले आणि पहाटे ४ वाजेपर्यंत झाड हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजवाहिन्यांची दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू केली.

या मदतकार्यामध्ये सुजित जाधव, चिंटू नार्वेकर, अमोल पराष्टेकर, जीवन माणगावकर तसेच इतर कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. मध्यरात्रीच्या वेळी घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सर्वांनी केलेल्या तत्पर कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!