कुडाळ | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे त्यांच्यामधील वस्तू विक्रीचे कौशल्य वाढावे म्हणून नेरूर हायस्कूल येथे आठवडा बाजार भरवण्यात आला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या या उपक्रमाचे कौतुक कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी केले.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे व्यावहारिक ज्ञान मिळावे शाळेपलीकडील जगामध्ये काय सुरू आहे भविष्यात आपण काय करू शकतो यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य निर्माण व्हावी या उद्देशाने नेरूर हायस्कूलच्या वतीने आठवडा बाजार हा उपक्रम राबवण्यात आला होता या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी गावठी भाजी तसेच वेगवेगळे प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवले होते या उपक्रमाला सभापती मिलिंद नाईक यांनी भेट दिली. व उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्यासोबत विभाग प्रमुख संदेश नाईक, सरपंच भक्ती घाडी आधी कार्यकर्ते तसेच शिक्षक उपस्थित होते


