कुडाळ | प्रतिनिधी
हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेक्रेटरी व संचालक पदाचा केशव उर्फ दीपक नारकर यांनी राजीनामा दिला आहे वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे महाराज यांनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या जवळ सुपूर्त केला आहे.
या राजीनामा मध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, गेले १२ वर्षे शिवाजी विद्यालय हिलोक मध्ये सेक्रेटरी या पदावर काम करत आहे, मात्र हल्लीच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आल्यामुळे मला सातत्याने जिल्हा परिषद मध्ये सभा, विषय समित्यांच्या सभा, आरोग्य विभागाचा सभा आणि आमदार निलेश राणे यांचे राजकीय कामकाज, सहकार क्षेत्रातील कामकाज व धार्मिक क्षेत्रातील कामकाज करताना मला हायस्कुलसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. गेले १२ वर्षे आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे, लोकप्रतिनिधीचे तसेच विद्यार्थ्यांचे आभार केशव उर्फ दीपक नारकर यांनी मानले आहे.
गत १२ वर्षात त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी मेहनत घेऊन काम केले मुख्यमंत्री शाळांमध्ये या शाळेला नेत्र दीपक यश मिळवून दिले


