Wednesday, August 19, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळसिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जी भरारी मारली आहे ती वाखाणण्याजोगी आहे - आमदार...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जी भरारी मारली आहे ती वाखाणण्याजोगी आहे – आमदार निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी 

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जी भरारी मारली आहे ती वाखाणण्याजोगी आहे आता या बँकेचे ग्रामीण भागात सुद्धा जाळे पसरले आहे असे आमदार निलेश राणे यांनी बँकेच्या नेरुर शाखा कार्यालय स्थलांतर कार्यक्रमा वेळी सांगितले. 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेरुर शाखा कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे या स्थलांतर झालेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटोवणेकर, प्रकाश मोर्ये, व्हिक्टर डान्टस, बाबा परब, नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर, कवठी सरपंच स्वाती करलकर, चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर, वालावल सरपंच राजेश प्रभू, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!