Friday, August 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ*आ. निलेश राणेंवर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे*

*आ. निलेश राणेंवर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे*

शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांची टीका

 

कुडाळ | प्रतिनिधी 

वैभव नाईक यांना मागील १० वर्षात जे जमले नाही ते काम आमदार निलेश राणे यांनी अवघ्या दीड वर्षात करून दाखवले असून आमदार निलेश राणेंवर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. अशी टीका शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी केली.  

मागच्या दीड वर्षात आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळात कोकणचे ज्वलंत प्रश्न मांडले असून कुडाळ – मालवणची जनता त्यांच्या कामावर समाधानी आहे. आमदार निलेश राणे जनतेसाठी झटत असून त्यांनी कधीही कंत्राट मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. उलट वैभव नाईक यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कोल्हापूरच्या कंत्राटदाराला मोठे करण्याचे काम केले अशी टीका शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी केली. यापुढे राणे कुटुंबियांवर टीका केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!