Saturday, August 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ गांधी चौकात राहुल गांधी यांचा 'छात्रों की गुंज' कार्यक्रम थेट प्रक्षेपण*

कुडाळ गांधी चौकात राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम थेट प्रक्षेपण*

कुडाळ, दि. 22

 देशभरातील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने शनिवारी सायंकाळी करण्यात आले

कुडाळ शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या *गांधी चौक* येथे यासाठी विशेष स्क्रीन उभारण्यात आली होती. तालुकाध्यक्ष *अभय शिरसाट* यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न व युवकांच्या भविष्यावरील आपली भूमिका मांडली. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

कुडाळात झालेल्या या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!