Wednesday, August 26, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळपिंगुळी भूपकरवाडी येथील गणेश कोंडीतील मगरीला बाहेर काढण्यासाठी तब्बल आठ तास लागले..

पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेश कोंडीतील मगरीला बाहेर काढण्यासाठी तब्बल आठ तास लागले..

कुडाळ | प्रतिनिधी 

पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेश कोंडीतील मगरीला बाहेर काढण्यासाठी तब्बल आठ तास लागले या कोंडीमध्ये असलेले पाणी मोटर पंपाच्या साह्याने उपसा करण्यात आले त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने ही मगर शितापीने पकडली हा रेस्क्यू पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

पिंगुळी भूपकरवाडी येथे गणेश विसर्जनासाठी गणेश कोंड बांधण्यात आली आहे आणि या गणेश कोंडी मध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याला मगर असल्याचे दिसून आले त्याने आपल्या गावातील लोकांना ही माहिती दिली. माहिती दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून या मगरीला पकडण्यासाठी सुरुवात करण्यात आली यामध्ये अडथळा महत्त्वाचा तो म्हणजे गणेश कोंडी मध्ये असलेले पाणी हे पाणी उपसा करणे गरजेचे होते त्यासाठी मोटर पंप आणण्यात आला या मोटर पंपाच्या साहाय्याने रात्रौ 11 वाजेपर्यंत हे पाणी उपसण्यात आले पण मगर काही सापडून आली नाही त्यानंतर आज मंगळवारी सकाळी मगर पकडण्याची मोहीम सुरुवात करण्यात आली. वनविभागाचे रेस्क्यू पथक, एमआयडीसीचे अग्निशामक दल, कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. या गणेश कोंडीतील पाणी उपसा केल्यानंतर मगर निदर्शनास आली वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने जाळे फेकले आणि या जाळ्यामध्ये भली मोठी मगर अडकली. या मगरीला बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले सुमारे आठ तास ही मोहीम सुरू होती. या मोहिमेकडे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील, वनपाल सूर्यकांत सावंत, वनरक्षक समीर खरवत, वनरक्षक सागर भोजने यांच्यासह जलद बचाव पथक अनिल गावडे, प्रसाद गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, संतोष इब्रामपूरकर, यशवंत कदम, राहुल महेकर यांनी ही मोहीम मार्गी लावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!