Tuesday, August 25, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ तालुक्यातील घोटगे - सोनवडे घाट मार्गाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी...

कुडाळ तालुक्यातील घोटगे – सोनवडे घाट मार्गाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी आमदार निलेश राणे यांची माहिती…

कुडाळ | प्रतिनिधी 

 

घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण घाटमार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.

यापूर्वी या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. याबाबत बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, “आज अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देताना मनाला फार समाधान वाटत आहे. घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पर्यावरणीय मंजुरी अगोदरच मिळालेली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक असलेली अंतिम परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.” या प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणारे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आमदार निलेश राणे यांनी यावेळी मनापासून आभार मानले. घोडगे-सोनवडे घाटमार्गामुळे सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारी वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, या मार्गामुळे परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

“हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलली जातील. सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पासाठी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केले, प्रयत्न केले त्या सर्वांचे तसेच संबंधित अधिकारी यांचे आभार आमदार निलेश राणे यांनी मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!